पुढील पाच दिवस देशात उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी तापमान ४७-४८ अंशांवर जाण्याची शक्यता

0
130
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः आजपासून पुढील पाच दिवस भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्याचा फटका पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रालाही बसणार आहे. ३ मेपासून मात्र तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. या दिवसात काही भागातील तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.

भारताच्या पूर्व, मध्य आणि वायव्य भागात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट राहणार आहे, असे भारतीय हवामान खात्याने बुधवारी जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे. उत्तर भारतात २९ एप्रिल रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ मेपासून तापमानात घट होत जाईल, असे भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर.के. जेनमनी यांनी म्हटले आहे.

 समुद्रसपाटीपासून एक ते दीड किलोमीटरवर हवेचा दाब वाढल्यामुळे उष्णतेची तीव्र लाट आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागात किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या देशाच्या या भागात किमान तापमान ४५ अंश सेल्सिअपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा