सीएएविरोधी आंदोलनः शाहीनबागेत प्रचंड पोलिस बंदोबस्त, जमाव आदेश लागू

0
46
शाहीनबाग आंदोलनाचे संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः गेल्या अडीच महिन्यांपासून सीएए आणि एनआरसीविरुद्ध महिलांचे आंदोलन सुरू असलेल्या दक्षिण दिल्लीतील शाहीनबागेत पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश लागू केले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 हिंदू सेना कडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेने आज येथील आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे केले जातील, अशी घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले होते. या पार्श्वभूमीवर येथे जमाव बंदी आदेश लागू करून आंदोलन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हिंदू सेनेचे नियोजित आंदोलन वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. परंतु खबरदारी म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे, असे दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलिस उपायुक्त आर. पी. मीना यांनी सांगितले.

 शाहीन बागेत दोन महिला पोलिसांच्या तुकड्यांसह एकूण बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्येक पोलिस ठाण्यातील १०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शाहीन बागेत गेल्या १५ डिसेंबरपासून सीएए आणि एनआरसीविरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळापासून जामिया मिल्लिया विद्यापीठ जवळच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा