आजपासून चार दिवस राज्यात पावसाचे धुमशान, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

0
863
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रभर विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असतानाच आजपासून पुढील चार दिवस राज्यात पावसाचे धुमशान सुरू होणार आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यभर पावसाने मुक्काम ठोकला आहे. अनेक ठिकाणी संततधार सुरू आहे. अधूनमधून पाऊस जोरदार वर्दी देतो आणि पुन्हा संततधार सुरू होते. त्यामुळे राज्याच्या अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः हाताशी आलेले मुग आणि उदडाचे पिक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला असून मुग-उदडाला झाडावरच कोंब फुटू लागले आहेत.

२५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होई, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यात संततधार सुरू असतानाचा पुढील चार दिवसांसाठी अरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा