‘शिकलेल्या हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना जाळ्यात ओढतात’, माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य

1
383
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतात शिकलेल्या हिंदू मुली मुस्लिम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा लव्ह जिहादमुळे मुस्लिम मुलींचेच जास्त नुकसान होत आहे, असे वक्तव्य भारताचे माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे. कुरेशी यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिजाबच्या वादावरही कुरेशी यांनी आपले मत मांडले आहे. हिजाब वापरावा की नाही, हे मौलवी ठरवतील, न्यायमूर्ती नव्हे, असेही कुरेशी म्हणाले.

लव्ह जिहाद हा केवळ प्रपोगंडा आहे. त्यात मुस्लिम मुलींनाच जास्त धोका आहे. त्यांच्या नजरेतून लव्ह जिहादकडे पाहिले तर शिकलेल्या हिंदू मुली मुस्लिम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा परिस्थितीत लव्ह जिहादमुळे मुस्लिमांचेच जास्त नुकसान आहे, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहादसाठी हिंदू मुलीच जबाबदार आहेत. मुस्लिमांमध्ये हुंड्याची प्रथा नाही. हिंदू मुली हुंडा वाचवण्यासाठी शिकल्या-सवरलेल्या मुस्लिम मुलांशी लग्न करतात. ही परिस्थिती सुधारली तर लव्ह जिहाद कमी होईल, असेही कुरेशी म्हणाले. दिल्लीत सुरू असलेल्या लिटरेचर अँड आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपल्या ‘द पॉप्युलेशन मिथ’ या पुस्तकावर बोलताना कुरेशी यांनी ही विधाने केली आहेत.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

हिजाब हवा की नको हे जज्ज नव्हे मौलवी ठरवतीलः कुरेशी यांन हिजाबच्या वादावरही आपले मत मांडले. हिजाब कुरानचा भाग नाही. परंतु मुलींनी शालीन कपडे परिधान करावेत, असे कुरानमध्ये सांगण्यात आले आहे. शालेय गणवेशात शीखांना पगडी आणि हिंदू मुलींना कुंकू लावण्याची परवानगी आहे, तर मग हिजाबवरून वाद का? असा सवाल करत हिजाब आवश्यक आहे की नाही, याचा निर्णय मौलवी घेतील, न्यायमूर्ती नव्हे, असेही कुरेशी म्हणाले. शाळांमध्ये शीखांना पगडी आणि हिंदूंना कुंकू/टिळा लावण्याची परवानगी असेल तर मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यापासून का रोखले जात आहे?, असा सवालही कुरेशी यांनी केला आहे.

एक प्रतिक्रिया

  1. लव्ह जिहाद म्हणजे लव्ह मॅरेज करायचे नाही काय? हिंदू मुस्लीम प्रेमाला लव्ह जिहाद चे नाव दिल्या जाते,याचा अर्थ आपण संविधान मानत नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा