भाजपचे हिंदुत्व मनुवादी, शिवसेनेचे धर्मनिरपेक्षतेचे मूल्य असलेले: रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे

1
135
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः भाजपचे हिंदुत्व मनुवादी असून मनुवादी हिंदुत्व समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्य नाकारते. मात्र शिवसेनेचे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य असून शिवसेनेकडे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त प्रा. कवाडे औरंगाबादेत आले होते. हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यावरून पत्रकारांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल छेडले असता प्रा. कवाडे यांनी हे मत व्यक्त केले. प्रा. कवाडे यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही. त्याबाबत विचारले असता आघाडीचे सरकार आहे. मित्र पक्षांना सन्मानजनक वाटा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तो न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. पुढे विस्तार होईलच. त्यामुळे आशा जिवंत आहेत, असे ते म्हणाले.

एनआरसी, सीएए कायदा लागू करून मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा विभाजनाचा डाव आखला आहे. त्यामुळे देशाचा कोंडवाडा बनवला जात आहे.हीच प्रवृत्ती देश विघातक आहे. देशाचे अखंडत्व टिकवायचे असेल तर या देशातील हिंदू सेक्युलर राहिला पाहिजे, असेही कवाडे म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा