HSC Exam: बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचा प्रश्न, विद्यार्थांना मिळणार १ गुण

0
246
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC)  म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत १ गुणाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. हा चुकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठी असलेला एक गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत प्रश्न विचारताना छपाईमध्ये चूक झाली. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्य परीक्षा नियंत्रक आणि अभ्यास मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलेला हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठीचा एक गुण देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत चुकीचा प्रश्न विचारण्यात आल्याच्या तक्रारी असंख्य विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा नियंत्रक आणि अभ्यास मंडळाची बैठक घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ज्या विद्यार्थ्यांनी केला आहे, त्यांना बोर्डाकडून एक गुण देण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपला एक गुण हुकल्याची हुरहुर लागलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा