दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

0
111
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर १९ मार्च रोजी तर इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर ४ मार्च रोजी म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी होणार आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, १५ मार्च २०२२ तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.  आता बोर्डाने विषयनिहाय अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahahsscboard.in/  यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक त्या त्या विभागीय मंडळांच्या वतीने जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी झाल्याने यंदा होणाऱ्या सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा अर्धातास आधी होणार आहे.  कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखण सराव कमी झाल्यामुळे ८०,९० आणि १०० मार्काच्या परीक्षांना अर्धातास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ५०,६० आणि ७० मार्काच्या परीक्षांना १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. यंदाची परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने आणि ७५ टक्के अभ्यासक्रमावरच होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा