नरेंद्र मोदींमध्ये मला अफगाणचा ‘नजीब खान’ दिसतोः जयंत पाटलांचे टिकास्त्र

1
610
संग्रहित छायाचित्र.

भुसावळः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींमध्ये मला १७७१ मध्ये मराठी फौजेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तटबंदी उभारणारा नजीब खान दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात काल रात्री भुसावळ येथे ते बोलत होते. नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी ७० हून अधिक दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील या भीतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तटबंदी उभारून राहत आहेत. अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेही १७७१ मध्ये मराठी फौजेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारली होती. त्यामुळे मला नरेंद्र मोदींमध्ये नजीब खान दिसत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचाः कृषी कायद्याबाबतचे ‘गैरसमज’ दूर करण्यासाठी मोदी सरकारने खर्च केले तब्बल ८ कोटी रुपये!

नरेंद्र मोदींनी दोन घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. त्यामुळे मोदी तटबंदी उभारून रहात आहेत. स्टीलची रेलिंग, मोठमोठे खड्डे, तसेच रस्त्यावर अर्धा एक फुटाचे टोकदार खिळे ठोकून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काही तरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत रहात आहेत, असे पाटील म्हणाले.

महादजी शिंदे यांनी १७७१ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल या भीतीने अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खानने अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, असे सांगतानाच मोदींनी सुरूवातीलाच शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर हा विषय एवढ्या टोकाला गेलाच नसता, असेही पाटील म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा