करदात्यांना दिलासाः इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली!

0
100
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरण दाखल करण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. करदात्यांना नव्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक त्रुटींना सामोरे जावे लागत असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटीन ही माहिती दिली.  इन्कम टॅक्स कायदा १९६१ अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आणि लेखा अहवाल ई- फायलिंग पोर्टलवर दाखल करण्यासाठी करदात्यांना अडचणी येत असल्याचे कळवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने इन्कम टॅक्स रिटर्न आणि लेखा अहवाल दाखल करण्याची मुदत आणखी वाढवली आहे, असे इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

लेखा अहवाल दाखल करण्यासही मुदतवाढः इन्कम टॅक्स रिटर्न  दाखल करण्याची मुदत आधी ३१ जुलैपर्यंत होती. ती वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली होती. आता या मुदतीत आणखी वाढ करून ती ३१ डिसेंबर २०२१ करण्यात आली आहे. लेखा अहवाल दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. ती ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा