चीनी आक्रमणापुढे मोदींनी भारतीय भूप्रदेश सोडून दिलाः राहुल गांधींचा गंभीर आरोप

0
102
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठकीत दिलेल्या स्पष्टीकरणावरच जोरदार आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत. आपल्या भूप्रदेशात कोणीही घुसखोरी केली नाही किंवा कोणतीही पोस्ट ताब्यात घेतली नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूप्रदेश चीनला देऊन टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पूर्वलडाखमध्ये  प्रत्यक्ष ताबा रेषेवर झालेल्या भारत- चीन संघर्षात भारताचे २० हून अधिक जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी चीनने आपल्या भूप्रदेशात घुसखोरी केलेली नाही किंवा भारतीय चौकीही ताब्यात घेतलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. मोदींच्या या स्पष्टीकरणावर आता जोरदार आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. चीनने घुसखोरी केलीच नाही तर भारताचे २० जवान शहीद कसे झाले, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. चीनी आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूप्रदेश देऊन टाकला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला असून जर भूप्रदेश चीनचा होता तर आमचे जवान का मारले गेले?  आणि ते कुठे मारले गेले? असे सवालही राहुल गांधी यांनी केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा