भारतात पब्जी मोबाइल गेमिंग ऍपवरही बंदी!

0
101
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारत- चीन दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पब्जी या भारतातील लोकप्रिय मोबाइल गेमिंग ऍपसह ११८ ऍपवरही बंदी घातली आहे. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा बंदी आदेश जारी केला.

पब्जी या मोबाइल गेमिंग ऍपचे भारतीयांना प्रचंड वेड आहे. भारतामध्ये पब्जी या व्हिडीओ गेमिंग ऍपची सर्वात मोठी बाजारपेठ असून १७५ दशलक्ष लोकांनी पब्जी हे ऍप डाऊनलोड केले आहे. भारतात डाऊनलोड करण्यात आलेल्या एकूण ऍप्सच्या तुलनेत पब्जी डाऊनलोडिंगचे हे प्रमाण तब्बल २४ टक्के आहे. पब्जी हा ऑनलाइन मल्टिप्लेअर बॅटल रोयले गेम असून तो विविध प्लॅटफार्मवर उपलब्ध आहे. आयरिश व्हिडीओ गेम डिझायनर ब्रेन्डन ग्रीने यांनी डिझाइन केलेल्या मॉड्स या ऍपपासून प्रेरणा घेऊन पब्जी तयार करण्यात आले आहे.

 केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अन्वये पब्जीसह ११८ मोबाइल ऍपवर बंदी घातली आहे. हे मोबाइल ऍप्स बेकायदेशीरपणे युजर्सचा डेटा चोरत आहेत. चोरी केलेला डेटा भारताबाहेर असलेल्या सर्व्हरला पाठवला जात होता, अशा अनेक तक्रारी आल्या होत्या.

हा देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न असल्याने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. म्हणून ही बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी भारत सरकारने टिकटॉक या प्रचंड लोकप्रिय ऍपसह हॅलो ऍपवरही बंदी घातलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा