बीडच्या दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, ७ महिन्यांचा गरोदर पत्नीच्या पोटात भोसकला चाकू!

0
1076
छायाचित्रः बालाजी रुद्रवार यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

न्यू जर्सी/मुंबईः महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील दाम्पत्याचा अमेरिकेतील न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी त्यांच्या घराच्या बाल्कनीत एकटी येऊन रडत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हे दाम्पत्य रहात असलेल्या नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले, असे वृत्त काही अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.

३२ वर्षीय बालाजी भारत रुद्रवार आणि त्यांची ३० वर्षीय पत्नी आरती बालाजी रूद्रवार अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. विशेष म्हणजे आरती या गरोदर होत्या. लिव्हिंगमध्येच भारत यांनी आरती यांच्यावर चाकूने पोटात वार केले. आरतीने हा चाकू हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही, असे अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

बालाजी आणि आरती न्यू जर्सीती नॉर्थ अर्लिंग्टन येथील रिव्हरव्ह्यू गार्डन्स कॉम्प्लेक्समधील २१ गार्डन टेरेस अपार्टमेंट रहात होते. हा सुमारे १५ हजार लोकांची वसाहत आहे.

माझी चार वर्षांची नात बाल्कनीत येऊन एकटीच रडत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घरात प्रवेश करून पाहिले असता दोघांचे मृतदेह आढळून आले, असे बालाजी यांचे वडिल भारत रुद्रवार यांनी सांगितले.

काही स्थानिक अमेरिकी वृत्तपत्रांनी कंट्री प्रॉसीक्युटर कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकाचा हवाला देऊन म्हटले आहे की, पोलिसांनी घरात प्रवेश करून पाहिले असता मृतदेह आढळले. वैद्यकीय तपासणीत चाकूने भोसकल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे कारण काय आणि कोणत्या परिस्थितीत मृत्यू झाला, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र दोघांचाही चाकूने भोसकल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक पोलिसांनी मला गुरूवारी या घटनेची माहिती दली. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालाचे निष्कर्ष आम्ही तुम्हाला कळवू, असे अमेरिकी पोलिसांनी आपल्याला सांगितल्याचे भारत रुद्रवार म्हणाले.

माझी सून सात महिन्यांची गरोदर होती. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पुन्हा त्यांच्या भेटीसाठी अमेरिकेत जाण्याचे नियोजन करत होतो. मला कोणत्याही संभाव्य कारणांची माहिती नाही. ते आनंदी कुटुंब होते आणि त्यांचे शेजारीही प्रेमळ होते, असे भारत रुद्रवार यांनी तुम्हाला कोणावर संशय आहे का, असे विचारले असता सांगितले.

आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दोघांचे मृतदेह भारतात पोहोचाया आठ ते दहा दिवस लागतील, असे मला अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माझी नात सध्या माझ्या मुलाच्या मित्राकडे आहे. स्थानिक भारतीय समूहात बालाजीचे अनेक मित्र आहेत. न्यू जर्सीमध्ये ६० टक्के लोकसंख्या भारतीयांची आहे, असेही भारत रुद्रवार म्हणाले.

बालाजी रुद्रवार हे आयटी प्रोफेशनल आहेत. ते मूळचे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये ते सहकुटुंब अमेरिकेला गेले. डिसेंबर २०१४ मध्ये बालाजी आणि आरती यांचा विवाह झाला होता. बालाजी रुद्रवार हे अंबाजोगाईत व्यावसायिक आहेत. बालाजी रुद्रवार हे अमेरिकेत एका प्रसिद्ध भारतीय इन्फोटेक कंपनीत काम करत होते. तर त्यांची पत्नी घरीच असायची, असे भारत रुद्रवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा