भारताच्या हरनाझ संधूने पटकावला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब

0
133

इलायतः पंजाबची सौंदर्यवती चंदीगड गर्ल हरनाझ संधू मिस युनिव्हर्स-२०२१ किताबाची मानकरी ठरली. इस्राएलमधील इलायत येथे झालेल्या या बहारदार स्पर्धेत मेक्सिकोची अँड्रिया मेझाने हरनाझ संधूच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुट चढवला. तब्बल २१ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला आहे.

जगभरातील सौंदर्यवतींनी मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात पंजाबची सौंदर्यवती हरनाझ संधू सर्वांत सरस ठरली आणि तिने हा किताब जिंकला. यापूर्वी २००० मध्ये लादा दत्तने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. लारा दत्तनंतर तब्बल २१ वर्षांनंतर हरनाझ संधू मिस युनिव्हर्स किताबाची मानकरी ठरली आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

पंजाबच्या शीख कुटुंबात जन्मलेली हरनाझ संधू कमी वयापासूनच सौंदर्यवती स्पर्धेत भाग घेते. मॉडेलिंग करणाऱ्या हरनाझने पंजाबी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. दियां पू बारां आणि बाई जी कुट्टांगे या दोन पंजाबी चित्रपटांतही हरनाझ संधूने काम केले आहे.

हरनाझ संधूने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब पटकावला होता. २०१९ च्या मिस इंडिया स्पर्धेतही हरनाझ संधूने भाग घेतला होता. मिस इंडिया स्पर्धेच्या टॉप १२ स्पर्धकांत तिने स्थान मिळवले होते. यंदाच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या मिस दिवा यूनिव्हर्स इंडिया स्पर्धेचा मुकुटही हरनाझने पटकावला होता. आता तिने थेट मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा