पीएफसह अल्पबचतींवरील व्याजदर जैसे थे, अर्थमंत्री म्हणाल्या चुकून निघाला आदेश

0
271
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली: अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने हा आदेश मागे घेतला आहे. हा आदेश चुकून निघाल्याचे सांगत पीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम राहतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर २०२०-२१ च्या तिमाहीत होते तेच राहतील.म्हणजेच मार्च २०२१ पर्यंतचे दर. चुकून निघालेला आदेश मागे घेण्यात येईल, असे ट्विट सीतारामन यांनी केले आहे.

१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्यांनी कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता.तर पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याजदर ४ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर आणण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील वायाजदर ७.४ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ टक्क्यांवरू ५.९ टक्क्यांवर आणण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संबंधीचे आदेश केंद्रीय गृह  मंत्रालयाने कालच जारी केले होते. या निर्णयामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच सर्वसामान्यांना मोदी सरकाने झटका दिला होता. आता तो निर्णय मागे घेतल्याने दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा