आयपीएल २०२१: डेव्हीड वॉर्नरची कर्णधारपदावरून उचलबांगडी, एसआरएचचे नेतृत्व विलियमसनकडे

0
105
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या (एसआरएच) संघाने स्पर्धा सुरू असतानाच मोठा निर्णय घेतला असून डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. आता एसआरएचचे नेतृत्व न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे सोपवण्यात आले आहे.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात एसआरएचला आतापर्यंत झालेल्या लढतीत फक्त एकच सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतक्यात एचआरएच सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. या स्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी एसआरएचच्या व्यवस्थापनाने हा बदल केला आहे.

एसआरएचचा सातत्याने होत असलेला पराभव लक्षात घेता संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटून डेव्हीड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकून आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनकडे एसआरएचचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

उद्या सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सशी सामना होणार आहे. या सामन्यापासून केन विलियमसनकडे एसआरएचचे नेतृत्व असेल. केन विलियमसनकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले असले तरी डेव्हीड वॉर्नर एसआरएच संघात कायम राहणार आहे.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात एसआरएचला पहिल्या सहा सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. एसआरएचच्या खात्यावर गुणतक्त्यात फक्त दोन गुण आहेत. एसआरएच गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा