मालगाड्या वगळता देशभरातील सर्व रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद!

0
79
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज भारतीय रेल्वेने ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील सर्व प्रवाशी रेल्वे रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरात एकही रेल्वे धावणार नाही. फक्त मालगाड्या तेवढ्या सुरू राहतील.

 रविवारी सकाळी झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत देशात एकही प्रवाशी रेल्वे धावणार नाही. फक्त मालगाड्या सुरू राहतील, असा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. उपनगरातील रेल्वे म्हणजेच लोकल आणि कोलकोता मेट्रोतील रेल्वे आज रात्रीपर्यंतच चालतील. १३ मार्चपर्यंत रेल्वेने प्रवास केलेल्या १२ प्रवाश्यांमार्फत देशातील १६ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत झारखंडमध्ये एकही रेल्वे येऊ नये, अशी विनंती झारखंड राज्य सरकारने यापूर्वीच रेल्वे बोर्डाला केली होती.

जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो आधीपासूनच बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री काही वेळासाठी दिल्ली मेट्रोच्या रेल्वे धावतील. रविवारी कोणत्याही प्रवाशी रेल्वे धावणार नाहीत, असे भारतीय रेल्वेने आधीच जाहीर केले होते. या निर्णयानुसार शनिवारीमध्यरात्रीपासून रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत देशभरातील प्रवाशी रेल्वे बंद करण्यात आल्या  होत्या. आता ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत मालगाड्या वगळता देशभरातील सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा