जुकार घाट : स्पेनचे भव्यदिव्य खोरे

0
52

जुकार घाट हे स्पेनचे ४० किलोमीटर लांबीचे नयनरम्य चुनखडी दगडांनी बनलेला घाट आहे. कॅस्टिला ला मंचा या ग्रामीण पर्यटन मार्गावर असलेल्या या खोऱ्यात गुहेसारखी घरे असलेली ऐतिहासिक खेडी आहेत…

आम्ही भारतातून आलो आहोत, असे तुम्ही जेव्हा अल्काला डेल जुकारच्या पर्यटन कार्यालयाच्या रिसेप्शनवर बसलेल्या तरूण महिलेला सांगता, तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन जाते. तुम्हाला आमच्याविषयी कसे कळले? या ठिकाणाबद्दल कुणालाच माहिती नाही. कुणालाच म्हणजे स्पॅनिश नागरिक सोडले तर अन्य कुणालाही या ठिकाणाबद्दल माहिती नाही, असे तिला म्हणायचे असते. आणि हो, स्पॅनिश लोकांतही अल्काला प्रसिद्धीपासून दूरच आहे.

अल्काला ही मध्य स्पेनच्या ला मंचुएलामधील जुकार खोऱ्यातील खेड्यांची शृंखला आहे. अल्बासेट प्रांतातून तब्बल ४० किलोमीटर लांबीच्या नयन मनोहरी चुनखडीच्या डोंगरावर ती वसलेली आहे. चुनखडीच्या डोंगरावर वसलेल्या जोरकीरा या खेड्याचे छायाचित्र एवढे जादुई दिसते की, क्षणभर ते संगणकावर तयार केलेले तर नाही ना? असे म्हणून आपण त्यावर विश्वासच ठेवायला तयार होत नाही. अल्काला हे अद्वितीय नैसर्गिक पर्यावरण आणि वास्तुकलेचा अत्यंत मनोहरी नमुना असलेले ठिकाण आहे. युरोपची सांस्कृतिक राजधानी असलेल्या दक्षिण इटलीच्या बासिलिकाटामधील मटेरा या दगडावर कोरलेल्या शहरात आणि अल्कालामध्ये बऱ्याच गोष्टींत साम्य आहे. मटेराप्रमाणेच जुकारमधील अनेक खेडी खोऱ्यातील डोंगराच्या सुकळ्यावर कोरलेली आहेत. दोन्हीकडेही भूमिगत बोगदे, कृत्रिम गुहांसारखी घरे आणि मध्ययुगीन रस्ते आहेत. पण एकीकडे मटेरा पर्यटकांच्या प्रचंड संख्येचा ताण झेलत असताना दुसरीकडे जुकारचा प्रेरणादायी रमणीय भूप्रदेश मात्र कुणालाच फारसा माहीत नाही. विशेष म्हणजे अल्काला खोऱ्याला १९८२ मध्ये विशेष ऐतिहासिक आणि कलात्मक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे, तरीही हे ठिकाण दुर्लक्षित राहिलेले आहे. तुम्हाला जर सस्सी डी मटेरापेक्षा वेगळे पर्यटनस्थळ हवे असेल तर अल्काला हा अधिक शांत आणि साहसी पर्याय तुम्ही निवडू शकता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा