मंत्री धनंजय मुंडेंभोवती फास टाकायला आल्या, पण स्वतःच ‘अशा’ जाळ्यात अडकल्या करूणा शर्मा!

0
917
संग्रहित छायाचित्र.

बीडः करूणा शर्मा हे नाव गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याचा आणि या पत्रकार परिषदेत आपल्यावरील अत्याचाराचे खुलासे करण्याचा त्यांचा इरादा त्यांच्याच चांगलाच अंगलट कसा आला? त्या पद्धतशीरपणे कायद्याच्या कचाट्यात कशा अडकल्या? परळीत येऊन धनंजय मुंडेंना आव्हान देण्याचा म्हणजेच वाघाच्या गुहेत येऊन वाघालाच ललकारण्याचा त्यांचा प्रयत्न कसा फसला?  हे आणि असे अनेक गंभीर आणि गंमतीशीर प्रश्नही आता चर्चिले जाऊ लागले आहेत.

करूणा शर्मा यांनी परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याची घोषणा फेसबुक लाइव्हवर केल्यानंतर त्यावर ज्या काही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, त्या पाहता करूणा शर्मा परळीतून सुखासुखी परतू शकणार नाहीत, हे गुरूवारीच निश्चित झाले होते. त्या प्रतिक्रया वाचून जर करूणा शर्मा यांनी परळीत येणे टाळले असते तर पुढच्या सगळ्याच कटकटी त्यांना टाळता आल्या असत्या. परंतु मुंडे समर्थकांकडून आपणाला विरोध होणार याचा अंदाज येऊनही करूणा शर्मा परळीत आल्या.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

मूळात करूणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले भांडण आणि वाद कौटुंबिक आहे का? की वादाला कुणाची चिथावणी आहे?  असाही प्रश्न निर्माण होतो. गुरूवारच्या फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी ‘पंकजाताई मी तुमची नणंद, २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्या बरोबर’ असे जे वाक्य बोलले, तेव्हाच त्यांचा हेतू स्पष्ट झाला होता. परळीत पोहोचण्याआधी शनिवारी करूणा शर्मा यांनीएक फेसबुक पोस्ट केली. बीडमधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेणार आहे. अतिवृष्टीने झालेल्या ठिकाणी पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे. ५/९/०२१ रविवारी १२ वाजता परळी वैजनाथमधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. या लाईव्हदरम्यान माझ्यावर, आईवर, बहिणीवर, मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल तसेच मुलांना कशाप्रकारे धमकीचे फोन येत आहेत, याबाबतदेखील मी रविवारी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार आहे, असे या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते. म्हणजे करूणा शर्मा यांचा बीडमध्ये येण्याचा हेतू का केवळ कौटुंबिक वादाचे गाऱ्हाणे मांडणे एवढाच नव्हता, हेही स्पष्ट होते. धनंजय मुंडेंना राजकीय नुकसान पोहोचवणे हाही त्यांच्या या दौऱ्यामागचा हेतू होता, हेही स्पष्ट होऊ लागल्याने त्यांच्या या दौऱ्याला राजकीय रंगाचा वासही या फेसबुक पोस्टमधून येतो.

हेही वाचाः अपने को तो रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके… ऐका करुणा शर्माची व्हायरल कॉल रेकॉर्डिंग!

करूणा शर्मा यांच्या फेसबुक लाईव्हनंतर लगेच धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सुषमा सिंह यांच्या मार्फत सर्व माध्यमांना एक प्रेसनोट जारी करण्यात आली. २८ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट व संवेदनशील असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे काहीही प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यास करूणा शर्मा यांना निर्बंध घातलेले आहेत. असे असताना कथित करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो, त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये, असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील श्रीमती सुषमा सिंह यांनी सर्व प्रसार माध्यमांना पाठवले होते.

 त्यामुळे करूणा शर्मा पत्रकार परिषद घेऊन जे काही सांगणार होत्या, त्याला प्रसिद्धी मिळणार की नाही, हेही निश्चित नव्हते. तरीही त्या परळीत आल्या. परळीत येऊन त्यांनी वैजनाथाच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. तेथे मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे करूणा शर्मा यांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचीच संख्या जास्त होती. तेथे करूणा शर्मा आणि मुंडे समर्थक महिला कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिस करूणा शर्मांना घेऊन पोलिस ठाण्यात गेले. करूणा शर्मा पोलिस ठाण्यात पोहोचल्या तेव्हाच त्यांची पत्रकार परिषद होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले होते. करूणा शर्मा पहिल्यांदा फसल्या त्या येथे.

करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांच्या गाडीत पिस्टल आढळून आले. मग पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. हे पिस्टल त्यांच्या गाडीत कुठून आले? का आले? पिस्टल सोबत आणण्याचा करूणा शर्मा यांचा हेतू काय होता? घातपात करण्याच्या उद्देशाने त्या परळीत आल्या होत्या का? असे प्रश्न या निमित्ताने चर्चिले जाऊ लागले. गाडीत पिस्टल आढळले आणि करूणा शर्मा दुसऱ्यांदा कायदेशीर कचाट्यात फसल्या.

पिस्टलचे प्रकरण आणि त्याची चौकशी सुरू असतानाच विशाखा रविकांत घाडगे यांनी करूणा शर्मा आणि अन्य एकाविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद परळी शहर पोलिसांत दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांना करूणा शर्मासह अन्य एका विरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१)(आर), ३ (१)(एस) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला. ऍट्रॉसिटीच्या या गुन्ह्यात किमान सहा महिने कमाल सात वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. हा गुन्हा दाखल झाला आणि करूणा शर्मा तिसऱ्यांदा कायदेशीर कचाट्यात फसल्या. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या परळीत येऊन त्यांना गोत्यात आणण्याचा करूणा शर्मा यांचा इरादा त्यांना चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा