नागपुरातील नऊ वर्षांपासून प्रलंबित ॲम्पी थिएटरसाठी मिळणार जागा

0
25
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले. 

राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार हरिभाऊ राठोड, नागपूर महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी ठाकरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लीला उपाध्ये, अवर सचिव सं.कृ.भोसले उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. यापुढे अधिक विलंब न करता तातडीने जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे सभागृह उभारण्याचे प्रस्तावित होते. सन २०१२-१३ पासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मार्गी लावावा. अशी जनभावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर जागा मिळवून देवून प्रकल्पाचे भूमिपूजन करावे, अशी मागणी याविषयी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी आमदार हरिभाऊ राठोड आणि एकनाथ पवार यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा