दहा दिवसांत लसीचा पहिला डोस घ्या, अन्यथा तुमची लस घेण्याची संधीच हुकणार!

1
557
प्रातिनिधिक छायाचित्र.

परभणीः  कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना नागरिकांवर मात्र त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र काही जिल्ह्यांत पहायला मिळते आहे. त्यावर उपाय म्हणून परभणी जिल्हा प्रशासनाने लसीकरणाबाबत आता ताठर भूमिका घेतली असून येत्या दहा दिवसांत कोरोना लसीचा पहिला डोस घ्या, अन्यथा तुम्हाला पुन्हा लस घेण्याची संधीच मिळणार नाही, असा थेट इशाराच परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर केवळ ३७ टक्के नागरिकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे परभणी जिल्ह्याचे हे प्रमाण राज्याच्या तुलनेत प्रचंड मागे आहे. त्यामुळेच आता जिल्हा प्रशासन आता २० डिसेंबरनंतर पहिल्या डोसच्या मागे न लागता दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे ज्यांनी लसीचा पहिला डोस अद्याप घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर पहिला डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

परभणी जिल्हा प्रशासनाने लसीचा पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांसाठी दहा दिवस दिले आहेत, दहा दिवसांनंतर म्हणजेच २० डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठीच आपली संपूर्ण ताकद लावणार आहे. त्यामुळे  परभणी जिल्ह्यातील नागरिकांना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी आता केवळ शेवटचे दहा दिवस राहिलेले आहेत, असेच म्हणावे लागेल.

मराठवाड्यातील लसीकरणाची स्थिती अशीः परभणी जिल्ह्यातील साडेचार लाख नागरिकांनी अद्याप लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. लसीकरणाच्या बाबतीत मराठवाड्यात परभणीचा क्रमांक पाचवा तर राज्यात २९ वा क्रमांक लागतो. मराठवाड्यातील एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या अशीः

नांदेडः ९ लाख ७ हजार १८५

औरंगाबादः ६ लाख ६८ हजार ३५५

लातूरः ५ लाख ९२ हजार ४२२

 राज्यात ७ डिसेंबरपर्यंत १२ कोटी ३ लाख १८ हजार २४० डोस देण्यात आले आहेत. १८ पेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येपैकी किमान एक डोस  घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ८३.७४ टक्के आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे प्रमाण ७६.६९ टक्के तर ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे प्रमाण ८६.२५ टक्के आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

एक प्रतिक्रिया

  1. कोरोनाचा ईलाज म्हणून फक्त लस हा ऐकच उपाय आहे का?
    आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी हे हद्दपार झाले आहेत का?
    केंद्र सरकारने लस “ऐच्छिक” आहे अस जाहीर करून सुध्दा राज्यसरकार नको ते निर्बंध लादून संविधानाच्या कलम १४,१९,२१ च उल्लंघन करुन जबरदस्ती का करत आहे?
    महाराष्ट्र सरकारने ज्यांना काही कारणास्तव लस घेऊ शकत नाही त्यासाठी लसीला पर्याय म्हणून डॉ.. कडून सर्टिफिकेट घेता येऊ शकत अशी ऑर्डर काढली आहे ती सर्वसामान्यांपर्यंत मिडीया च्या माध्यमातून का सांगितले जात नाही?

    यावर काही बोलायची तुमची इच्छा का होत नाही??

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा