लवासा प्रकल्पाबाबत शरद पवार, सुप्रिया सुळेंवरील आरोपांत तथ्यः मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण, मात्र…

0
219
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लवासा प्रकल्पात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना स्वारस्य होते, हे स्पष्ट आहे. लवासा प्रकल्पाला परवानगी मिळावी म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा प्रशासनावर प्रभाव होता, हे याचिकादाराचे म्हणणे निराधार म्हणता येणार नाही. त्यांचे काही आरोप खरे आहेत, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने लवासा प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली.

लवासा प्रकल्प बेकायदेशीर असून या प्रकल्पातील बांधकामे पाडण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नाशिकमधील वकील नानासाहेब जाधव यांनी दाखल केली होती. या याचिकेत शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. लवासा प्रकल्पासाठी कोणतेही टेंडर काढण्यात आलेले नाही, असाही आरोप या याचिकेत करण्यात आला होता.

शरद पवार यांचे निकवर्तीय मानले जाणारे उद्योगपती अजित गुलाबचंद यांच्या लवासा कंपनी आणि हा प्रकल्प वाचवण्यासाठी २००५ मध्ये विरोधकांचा विरोध डावलून कायद्यात दुरूस्त्या करण्यात आल्या. या दुरूस्त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आल्या, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून बेकायदेशीर परवानग्या घेऊन लवासा प्रकल्प उभारण्यात आला, असा आरोपही या जनहित याचिकेत करण्यात आला होता.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 लवासा प्रकल्पात यापूर्वीच बांधकामे पूर्ण झाली आहेत. याचिकादाराने आव्हान देण्यास खूपच विलंब केला आहे. त्यामुळे बांधकामे पाडण्याचे आदेश देता येणार नाहीत, असे स्पष्ट करून न्यायालयाने ही जनहित याचिका निकाली काढली. या याचिकेची सुनावणी पूर्ण करताना न्यायालयाने लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरूस्ती योग्य आहे, असेही स्पष्ट केले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 पवार कुटुंबाने दिले होते आरोपांना उत्तरः या जनहित याचिकेत करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले होते. लवासा प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करताना प्रकल्पाशी संबंधित  असलेल्यांना प्रतिवादी करण्यात आलेले नाही. केवळ प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रकल्पाशी संबंध नसतानाही आपल्याला प्रतिवादी करण्यात आले आहे, असे या उत्तरात म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा