लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

0
391
संग्रहित छायाचित्र.

पुणेः ‘नटरंगी नार’ या लावण्यांचया बहारदार कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे घड्याळ अधिकृतपणे आपल्या हातावर बांधणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे.

 १६ सप्टेंबर रोजी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. मी आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जाऊन जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न, गोरगरिबांचे विविध प्रश्न मला सोडवायचे आहेत. म्हणून मी राजकारणात येत आहे, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 सुरेखा पुणेकर यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्रामकडे त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारीही मागितली होती.

 कोरोना काळात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सुरेखा पुणेकरही इच्छूक आहेत. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देते काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा