चला उद्योजक बना: जाणून घेऊ या उद्योग-व्यवसायासाठीच्या विविध कर्ज, अनुदान योजना

0
180
प्रातिनिधिक छायाचित्र.

प्रत्येकाच्याच मनात आपला एखादा छोटासा तरी उद्योग उभारणीची आंतरिक इच्छा असते. मनात योजनाही असतात. काही तरी करून दाखवण्याची उर्मी आणि समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची धमकही असतेच. परंतु नुसतीच इच्छा किंवा उर्मी असून उद्योग उभारणीचे आणि उद्योजक बनवण्याच्या स्वप्नाची पूर्तता होत नसते. त्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते अर्थ सहाय्य आणि उद्योग उभारणीसाठीचा आवश्यक नियोजनबद्ध आराखडा!

देशात उद्योजकता वाढीस लागावी, पारंपरिक उद्योगांचे नव्याने पुनर्जीवन व्हावे आणि नोकरीच्या मागे धावत सुटलेले हात उद्योजक बनून रोजगार देणारे हात बनावेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत. तुमच्या स्वप्नातील उद्योग उभारणीचे स्वप्न साकार करण्यासाठी अर्थ सहाय्याची तरतूदही केलेली आहे. परंतु या योजना कोणत्या? त्या योजनांची अंमलबजावणी नेमकी कोण करते? कुठल्या कार्यालयात आपल्या उद्योजक बनण्याची स्वप्नपूर्ती दडून बसलेली आहे? एखादी योजना पदरात पाडून घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे? त्या योजनेचा लाभ घेण्याची नेमकी प्रक्रिया कोणती? कुठे भेटावे? कुणाकडे जावे? हेच बहुतांश जणांना माहितीच नसल्यामुळे मनात इच्छा आणि वेगळे काही करण्याची धमक असूनही आपले स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यताच अधिक असते. अशा उदयोन्मुख उद्योजकांच्या पंखांना नवे बळ देण्याची आणि त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेचा वाटसरू म्हणून न्यूजटाऊन विविध योजनांची माहिती विस्तृत स्वरुपात देणार आहे. ही माहिती अनेकांच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेतील मैलाचा दगड ठरावा, अशी आमची अपेक्षा आहे.  न्यूजटाऊनच्या दररोज अपडेट होणाऱ्या बातम्यांमध्ये विविध सरकारी योजनांची माहिती देणारी लिंक आम्ही देणार आहोत. या योजनांचे स्वरूप, लाभार्थी, अर्थ सहाय आणि प्रक्रिया याबाबतचा तपशील यामध्ये असणार आहे. प्रत्येकाच्या मनातील उद्योजक बनण्याच्या सुप्त इच्छांच्या पूर्ततेसाठी नियमित वाचत रहा न्यूजटाऊन! इच्छा तुमची मार्गदर्शन आमचे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा