दरवाढीचा भडकाः घरगुती गॅस सिलिंडर २५.५० रुपये, व्यावसायिक सिलिंडर ८४ रुपयांनी महागला!

0
100
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असतानाच आजपासून घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅम गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५.५० रुपये तर व्यावसायिक वापराच्या १९ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ८४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

 देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून देशभरात घरगुती वापराच्या आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावलेला असतानाच आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून करण्यात आलेल्या २५.५० रुपये वाढीमुळे मुंबईत १४.२ किलो ग्रॅम वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर ८३४. ५० रुपये झाला आहे. हेच दर दिल्लीत ८३४ रुपये, कोलकात्यात ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५० रुपये झाले आहेत.

 व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीही ८४ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. आजच्या दरवाढीमुळे मुंबईत व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा दर आता १५०७ रुपये मोजावे लागतील. जूनमध्ये हाच दर १४७०.५० रुपये होता. दिल्लीत हाच सिलिंडर १५५० रुपये, कोलकात्यात १६५१.५० रुपये आणि चेन्नईत १६८७.५० रुपये झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा