महागाईचे ‘अच्छे दिन’: चार दिवसांत घरगुती गॅसच्या किंमती दुसऱ्यांदा २५ रुपयांनी वाढल्या

0
131
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. चारच दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी गाठल्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असतानाच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतही भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतील आजच्या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस सिलिंडरच्या किंमतीतील नवीन दरवाढ आजपासूनच लागू झाली आहे.

या आधी २५ फेब्रुवारी रोजी गॅस सिलिंडरच्या किंमती २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. त्याआधी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. म्हणजेच अवघ्या २४ दिवसांतच घरगुती वापराचे गॅस सिलिंडर १२५ रुपयांनी महागले आहे. डिसेंबर महिन्यातील दरवाढ पकडली तर गॅस सिलिंडर तब्बल २०० रुपयांनी महागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा