ज्योतिरादित्य शिंदे अखेर भाजपमध्ये, शुक्रवारी दाखल करणार राज्यसभेची उमेदवारी

0
167
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेतले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 ज्योतिरादित्य शिंदे गुरूवारी भोपाळला जाणार असून शुक्रवारी, १३ मार्च रोजी ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेल, असे जे. पी. नड्डा म्हणाले.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळत नाही. हा पक्ष आता सत्यापासून दूर पळू लागला आहे, अशी टीका त्यांनी केली.

 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे भाजपमध्येच होत्या. त्यांच्या दोन काकू वसुंधराराजे आणि यशोधराराजे शिंदे सध्या भाजपमध्ये आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय ही त्यांची ‘घर वापसी’ असल्याचे ट्विट यशोधराराजे शिंदे यांनी केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा