ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशासाठी मुहूर्तावर मुहूर्त, दोनदा बदलली वेळ!

0
493
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची वेळ वारंवार पुढे ढकलण्यात येत असून त्यांच्या प्रवेशाला नेमका कोणता मुहूर्त लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल स्वतःच ट्विट करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काल सायंकाळी सहा वाजताच त्यांचा भाजप प्रवेश होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र तो काही झाला नाही. हा मुहूर्त टळल्यानंतर आज दुपारी साडेबारा वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश होईल, असे भाजपकडून अधिकृतरित्या कळवण्यात आले होते. शिंदे यांच्या भाजप प्रवेशाचा हाही मुहूर्त टळला आता दुपारी दोन वाजता त्यांचा भाजप प्रवेश होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची वेळ वारंवार का बदलली जात आहे?, ज्योतिरादित्य यांच्याकडूनच ही वेळ पुढे ढकलण्यात येत आहे की भाजपकडून? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा