65 तांड्यांवर पैसे वाटल्याचा व्हिडीओ : पाणीपुरवठा मंत्री लोणीकरांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

0
280
संग्रहित छायाचित्र.

जालना : 65 तांड्यांमध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे. सगळ्या तांड्यावर मी पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून… आणि म्हणून या निवडणुकीत मला काही भीती वाटत नाही आहे, असे वक्तव्य करून निवडून येण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार यांच्यावर सेवली पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जालन्यातील प्रचारसभेला गर्दी जमवण्यासाठी लोणीकरांनी ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या होत्या. नेर-शेवली परिसरातील तांड्यावर बोलताना त्यांनी 65 तांड्यांवर पैसे वाटल्याचे विधान केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारही केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या आदेशानुसार धनश्री भालचीम यांनी दिलेल्या फिर्यादीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकर यांचा हाच तो वादग्रस्त व्हिडीओ

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा