‘सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’, ठाकरेंवर टीका करताना हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली

1
898

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला तशी प्रचाराची पातळीही घसरू लागली आहे. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढताना नेते सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत असल्याचे दिसू लागले आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी एका प्रचारसभेत केलेले भाषण हा त्याचाच नमुना आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये बंडखोरी करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेले अब्दुल सत्तार यांच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करताना ‘मुसलमानांचे तुम्हाला एवढे वावडं आहे तर, सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’ अशा अश्लील भाषेत हर्षवर्धन जाधव टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांचा एका प्रचारसभेतील हाच तो असभ्य भाषेतील टीका करतानाचा व्हिडीओ.

औरंगाबाद जिल्ह्यातील एका प्रचारसभेत बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून भाषण केले आहे. ते म्हणाले,’ हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचे भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडे. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो, हे नाही. आमच्या खासदाराने 25 वर्षांत काय केलं, हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रॅफिक पोलिसाला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. अहो, तुम्ही येडे झाले का? त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले? हे शिवसेनेचं भाषण रहाणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना एक प्रश्न विचारतो. एवढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे तर सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का? कोण लागतो हा सत्तार? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे? चुलता आहे ? हमारे अब्दुलभाई अभी अभी शिवसेना में आए है….’ अशी पातळी सोडून हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हर्षवर्धन जाधव यांचे हे भाषण सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आल्याची टीका करणाऱ्या शिवसेनेने अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही दिली आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवरही टीका होताना दिसत आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा