शिवसेना पक्षप्रमुखांवर अश्लाघ्य टीका : हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्यावर दगडफेक, गाडी फोडली

0
412
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यामुळे बुधवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्यावर दगडफेक केली.

औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जाधव यांच्या बंगल्यासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्या. जाधव यांनी एका प्रचारसभेत बोलताना सिल्लोडचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. त्या वादातूनच हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटना कळल्यानंतर क्रांतीचौक पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका दुचाकीवरून आलेल्या तीन तरूणांनी ही दगडफेक केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. या दगडफेकीत जाधव यांच्या बंगल्याचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा :‘सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’, ठाकरेंवर टीका करताना हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली

हर्षवर्धन औकातीत रहा : दानवे

‘सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’ अशा अश्लाघ्य भाषेत टीका करणारे हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एक व्हिडिओ जारी करून त्यांनी हर्षवर्धन औकातीत रहा, असा इशारा दिला आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्यावर कारवाई करून त्यांना निवडणुकीतून बाद करण्यात यावे, अशी मागणी करणारी निवेदने बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात शिवसैनिकांनी दिली.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांना औकातीत रहाण्याचा इशारा दिला.

हेही वाचा : व्हिडीओ : 65 तांड्यावर मी पैसे वाटले : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रचारसभेत कबुली

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा