#मोदी_परत_जा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचारासाठी होत आहे प्रखर विरोध

0
77
छायाचित्र सौजन्य : ट्विटर

मुंबई : ज्या महाराष्ट्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोक्यावर घेतले, त्याच महाराष्ट्रात आता त्यांना विरोध वाढत चालला आहे. ब्रिटिश राजवटीत भारतीयांनी सायमन कमिशनला सायमन गोबॅक सुनावले होते, तसेच महाराष्ट्रातील नेटकर्‍यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्यात कोणत्याही पंतप्रधानांना गोबॅक म्हटले गेले नाही. मात्र मोदी हे गोबॅकचा इशारा मिळणारे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. शेतकरी आत्महत्या होत असताना मोदींनी कधी महाराष्ट्राचा दौरा केला नाही. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हाही मोदी आले नाही, आता मते मागायलाच आले आहेत, असा आक्षेप घेत ट्विटर इंडियावर #मोदी_परत_जा हॅशटॅग चालवण्यात येत आहे. हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगवर रविवारी दिवसभरात एक लाखाहून अधिक ट्विट करण्यात आले.

 रविवारी मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात आले. जळगावमध्ये त्यांची पहिली प्रचारसभा सुरू होण्यापूर्वी #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्विटर इंडियावर ट्रेंडिंग झाला. या हॅशटॅगवर तासाला सरासरी 617 यूनिक ट्विट्स होत आहेत. तासाला 55.9 हजार हॅशटॅग एक्सपोजर आहे तर दर तासाला 1825 रिट्विट होत आहेत, असे राइट टॅग डॉट कॉम या वेबसाईटवरील आकडेवारी सांगते. यावरून महाराष्ट्रात मोदींना होणार्‍या विरोधाची तीव्रता लक्षात येते. यापूर्वी चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या भारत दौर्‍याच्या निमित्ताने तामिळनाडूत गेलेल्या मोदींच्या विरोधात तामिळी जनतेनेही मोदी गो बॅक हा हॅशटॅग चालवून त्यांच्या दौर्‍याचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मराठी जनता मोदींना विरोध करू लागली आहे. जनतेकडून असा विरोध होणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

ट्विटरवरील स्क्रिनशॉट.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा