भाजपच्या ‘महाजनादेशा’ला काँग्रेस आघाडीचा लगाम, परळीत पंकजा मुंडे पिछाडीवर

0
41
प्रतीकात्मक छायाचित्र.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपच्या ‘महाजनादेशा’ला लगाम घातल्याचे चित्र सकाळी 11.14 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीतून दिसू लागले आहे. ‘अब की बार 220 पार’ हे भाजपचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे सध्याचे ट्रेंड्स सांगू लागले आहेत. राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जागा धोक्यात दिसू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी 18 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

सकाळी 11.14 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार 288 जागापैकी भाजप 100 मतदारसंघात आघाडीवर आहे. शिवसेना 64 मतदारसंघात पुढे आहे. काँग्रेस 44 मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेस 52 मतदारसंघात आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि अनेकांची राजकीय गणिते बिघडवलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 3 मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर एमआयएमही 3 मतदारसंघात आघाडीवर आहे. 14 मतदारसंघात अपक्षांनी आघाडी घेतली आहे. माकपचे उमेदवार 2 मतदारसंघात आघाडी राखून आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे 81 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा