परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा मोठा विजय

0
610
संग्रहित छायाचित्र.

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि पंकजांचे भाऊ धनंजय मुंडे हे विजयी झाले आहेत.

प्रारंभापासून परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यातच धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह बोलत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून ही निवडणूक भावनिक मुद्यावर नेण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. परंतु परळीच्या मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. परळीतील मायबाप मतदरांनी न्याय केला, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तर परळीतील निकाल माझ्यासाठी अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा