वंचित बहुजन आघाडीचे परतूरचे उमेदवार सवने यांच्यावर हल्ला, दगडफेक करून गाडी फोडली

0
284

जालना: परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी बप्पा सवने यांच्या गाडीवर शनिवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. या दगडफेकी सवने यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून सवनेही किरकोळ जखमी झाले आहेत.सवने हे शनिवारी रात्री प्रचार संपवून परत येत असताना शनिवारी रात्री आष्टी परिसरात ही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत सवने आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला कुणी व का केला, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा