व्हिडीओ : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नाकारली दोन कोटींची ऑफर, वरळीत आदित्य ठाकरेंविरुद्ध मैदान गाजवणारच!

0
1341

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे वरळी मतदारसंघातील उमेदवार गौतम गायकवाड यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्यासाठी त्यांना देऊ केलेली दोन कोटी रुपयांची ऑफर धुडकावून लावली आहे. मुंबई मराठी पत्रकारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे जाहीर केले. गौतम गायकवाड हे शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मैदानात आहेत.

 गौतम गायकवाड यांच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ जारी झाला आहे.त्यात ते म्हणतात की, प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने चांगल्या प्रकारे कौल मिळत आहे.त्याचा धसका शिवसेना पक्षाने घेतला असावा आणि म्हणून ठाण्यातून आनंद दिघे साहेबांचे विश्‍वासू कार्यकर्ते, विटावा- कळवा येथे रहाणारे गृहस्थ श्री शरद अहिरे आणि त्यांच्याबरोबरचे संजय वाघमारे या दोघांनी मला दादर या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष संपर्क साधला. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी मला दोन कोटी रुपयांची ऑफर दिली. तुम्ही रिटायर आहात. मुलांच्या तोंडचा घास काढून कशाला पैसे खर्च करता. दोन कोटी रुपये घ्या आणि गप्प बसा, तुमच्या आयुष्याचे सोने होईल, असे ते मला म्हणाले. माझ्या विचारांची धुरा सक्षमपणे हाताळत असताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी, म्हणूनच ही ऑफर देण्यात आली. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचितांचे हक्क प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असेही गौतम गायकवाड या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

पहा व्हिडीओ

वंचित बहुजन आघाडीचे वरळी मतदारसंघातील उमेदवार गौतम गायकवाड यांची मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषद.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा