यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु

0
50
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाईसंबंधी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या चर्चेत विधानसभा सदस्य मदन येरावार यांनी भाग घेतला.

बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ ही बँक नोंदणीकृत सहकारी बँक असून या बँकेत ५३६.३१ कोटी रूपयांच्या ठेवी असून बँकेमार्फत ३३६.५२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकेचा संचित तोटा १०८.६० कोटी रुपयेइतका आहे. या बँकेत बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आल्याबद्दल याची चौकशी सुरू आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

अनियमित कर्ज वाटप, कर्ज वसुलीसाठी ठोस कारवाई न करणे, चुकीच्या पद्धतीने ओ.टी.एस.योजना राबविणे आदी मुद्दयांचा त्यामध्ये समावेश आहे या चौकशी समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण झाल्यास कारवाई: आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीस विनापरवानगी हस्तांतरण केल्यास  तक्रारी प्राप्त होताच त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींना विनापरवानगी हस्तांतरण करण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात असे प्रकार केले असतील त्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी  विधानसभा सदस्य डॉ.किरण लहामटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंजुळा गावीत, यांनी भाग घेतला.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदींशिवाय अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक संहिता १९८९ च्या कलम ३ मध्ये आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे किंवा बळजबरीने आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या किंवा आदिवासी व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे ताबा काढून घेणाऱ्या किंवा तिचा उपभोग घेणाऱ्याविरूद्ध किमान ५ ते ६ वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकारच्या तक्रारी असतील त्यांच्याविरूद्ध स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करेल, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा