राफेलवर मनमोहन सिंगांनी तोंड उघडले तर मोदींचे कपडे फाटतील : प्रकाश आंबेडकर

0
66
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात राफेल आणि कलम 370 चा काय संबंध?  असा सवाल करत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह राफेलवर बोलले तर नरेंद्र मोदींचे कपडे फाटतील, असा थेट हल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

औरंगाबादेत आमखास मैदानावर आयोजित प्रंचड गर्दीच्या सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची फाटाफूट झाल्यानंतर औरंगाबादेत प्रकाश आंबेडकरांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बॅरिस्टर असदोद्दिन ओवेसी हे चांगले आहेत. पण त्यांचे साथीदार चांगले नाहीत. डॉ. गफार कादरी हे त्याला अपवाद आहेत, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता टीका केली.

राफेलवर राहुल गांधींनी बोलू नये. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राफेलवर तोंड उघडले तर मोदींची बोलतीच बंद होईल. पण त्यांना का बोलू दिले जात नाही, हेच मला कळत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्हाला वापरले गेले आहे, असे मुस्लिमांचे म्हणणे आहे. होय, त्यांचे हे दु:ख आहे ते आम्हाला मान्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरहीत आघाडी उभी राहिली होती. मुस्लिमांना न्याय देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न होता. मात्र ते न्यायाच्या बाजून उभे राहिले नाहीत., असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. येत्या सहा महिन्यांत पाच राष्ट्रीय बँका बुडतील, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर हल्ला केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा