विधानसभेच्या निवडणुका जाहीरः 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल

0
128

नवी दिल्ली:  सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. घोषित कार्यक्रमानुसार राज्यात 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया दिवाळीपूर्वीच पूर्ण केली जाणार आहे. महाराष्ट्राबरोबच हरियाणा विधानसभेचीही निवडणूक घेतली जाणार आहेमुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 8 कोटी 94 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी या निवडणुकीत 1.8 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत असून त्या आधीच राज्यात नवे सरकार स्थापन झालेले असेल.

निवडणूक कार्यक्रम असाः

  • 27 सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार.
  • 4 ऑक्टोबर ही उमेदवारी दाखल करण्याची मुदत असेल.
  • 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार.
  • 7 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
  • 21 ऑक्टोबर रोजी 288 जागांवर एकाच दिवशी मतदान होईल.
  • 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा