वंचित आघाडीच्या वरळीतील उमेदवारास आदित्य विरोधातून माघार घेण्यासाठी 2 कोटींची ऑफर

9
8433
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी 2 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. आनंद दिघे यांच्या विश्‍वासू कार्यकर्त्यांनी दादर परिसरात आपली भेट घेऊन ही ऑफर दिली, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी वरळी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकारानंतर गौतम गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी एक पोलिस कर्मचारी देण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच आपणाला शिवसेनेकडून कॉल सुरु आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे. या मतदारसंघात राज ठाकरेंनीही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे तुम्हीदोन कोटी रुपये घ्या आणि निवडणूक रिंगणातून माघार घ्या, असे फोन कॉलवरून सांगण्यात येत आहे. गुरुवारी आनंद दिघे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी दादर परिसरात आपली भेट घेतली आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी 2 कोटींची ऑफर दिली, असे गायकवाड म्हणाले. ठाण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही 25 लाख देतो, निवडणुकीतून माघार घ्या, असे सांगून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी अप्पर पोलीस आयुक्ताकड़े लेखी तक्रार दिली. या कॉलमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्याची विनंती गायकवाड यांनी पोलिसांना केली आहे. या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून हे कॉल येत असल्याचा संशयही गायकवाड़ यांनी व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस अधिकारी मैदानात उतरवून आव्हान दिले आहे.

9 प्रतिक्रिया

 1. एक माझा भिम बा झाला ….
  आणी आता त्यांचा” प्रकाश”आला

  देश हितासाठी संविधान
  देऊन गेला
  या देशाचा खरा “बाप ”
  होऊन गेला…

  पित्या प्रमाणे आज ही भारत देशा
  भिम माझा तुला जपत आहे

  कायदा भिमबा चा माझ्या
  मनुवाद्यांच्या मनात खपत आहे

  मनुवाद्यांनो जरि माझा भिमबा हयात नाही
  पण जिंवत आहे माज्या भिमबा ची लोकशाही

  ह्याच लोक तंञातुन आज भिमबा चा
  “प्रकाश” निघणार आहे

  अन वंचिताचा अधिकार विधानसभेत
  ऊभा राहून मागणार आहे

  भिमबा च्या ह्या प्रकाश ाने वंचिताच
  भाग्य उभारणार आहे

  भिमगर्जना हि सत्यात आज
  प्रकाश आंबेडकर साकारनार आहे

  आज घरात बसुन तुम्ही “आरे”
  जंगल तोडत आहात

  स्वार्थापोटी निसर्ग नकाशातुन
  खोडत आहात

  निसर्ग नियम सत्तेच्या माजातुन
  मोडत आहात

  हाच तूमचा सत्तेचा माज लवकरच
  आता जिरणार आहे

  भिमाबा चा “प्रकाश”वंचिताचा सरदार
  एकटा तुम्हाला पुरुन उरणार आहे

  तुम्ही सत्तेच्या नशेत इतके
  कशे चूर झालात
  पैशानी घर भरण्यासाठी
  किती र्कुर झालात

  मनुवाद्यांनो तुमच्या वर
  निसर्ग सुद्धा कोपणार आहे

  तुमची सत्ता नाहीच नाही तर
  तुमंच सार सरकार झोपणार आहे

  माझ्या भिमबा च्या प्रकाशात
  वंचित बहुजन तेजोमय होत आहे

  अवघा महाराष्टात आता फक्त वंचित
  बहुजन आघाडिच सरकार येत आहे

  राहूल मोकले

  नागसेन नगर ऊस्मानपुरा औरंगाबाद

  मो नं ९८३४७१०७७०

  जयभिम

  वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा