आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम राबवणार

0
31
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: आदिवासींसाठीच्या पदभरतीला गती देण्यात येईल, त्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात येईल, याबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अर्धा तास चर्चेत सहा विषयांवर चर्चा झाली. अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे भरणे यांनी सांगितले. सदस्य सुधीर मुनगंटीवार व संदीप दुर्वे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.     

चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनच्या कामाला गती मिळावी, याविषयी चर्चा झाली त्याला उत्तर देताना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी १५ कोटी ६५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरणे बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटमधून २७ गावे तसेच या योजनेत नव्याने ७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. सदस्य भास्कर जाधव यांनी चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरणे बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील कृषिपंपाकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या निर्देशानुसार वीजपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. सदस्य कृष्णा गजबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत बोलत होते. चर्चेत सदस्य राजेश पवार, आशिष जैस्वाल, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या विस्थापितांबाबत पुर्नविकास धोरणानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. त्याकरिता बैठकीचेही आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तनपुरे बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा