वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

0
371
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेल्याची घोषणा आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्र बंद यशस्वी झाला असून जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून हा बंद मागे घेतल्याची घोषणा त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीसह 35 संघटनांनी पुकारलेल्या या बंदला विविध 100 संघटनांनी पाठिंबा दिला होता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 अमरावतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली आणि आमच्या कार्यकर्त्यांनी कुठेही हिंसाचारही केलेला नाही, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला. एनआरसी आणि सीएएचा केवळ मुस्लिमांवरच नव्हे तर हिंदूवरही परिणाम होणार आहे. देशातील हिंदूंनाही त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी येणार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा