महाअर्थसंकल्प २०२०: घर खरेदीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात

0
211

मुंबईः देशातील मंदीच्या वातावरणामुळे राज्यालाही चटके बसू लागले आहेत. त्यामुळे घर खरेदीला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात जाहीर केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला आलेली मरगळ दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यात रिअल इस्टेट क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि घर खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात जाहीर करण्यात आली आहे.

देशातील आर्थिक मंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला असून घर खरेदी ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुद्रांक शुल्कात एक टक्का कपातीची घोषणा केली. ही सवलत मुंबई महानगर प्रदेश  प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि नागपूर विभागांतील ग्राहकांपुरतीच आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा