महाअर्थसंकल्प २०२० : बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ योजना

0
112

मुंबईः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक मंदीमुळे राज्यातील तरूण मंदीच्या सावटाखाली असून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ योजना सुरू करण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. या योजनेद्वारे पाच वर्षांत दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 अजित पवार म्हणाले, राज्यात नावीन्यपूर्ण उर्जापार्क तयार करण्यात येणार आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करणार. त्यासाठी ४ हजार कोटी यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शांळासाठी १० कोटी सहाय्य देण्यात येणार आहे. मराठी वर्तमानासाठी जाहिराती देण्यात येतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी तरुणांच्या सहकार्याने योजना सुरू करण्यात येईल.

आर्थिक मंदीच्या सावटाखाली तरुण. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ योजना सुरू केली जाणार आहे. याद्वारे पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. या योजनेसाठी १५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. १ लाख उद्योग घटक निर्माण होणार. १३० कोटी रुपये प्रस्तावित आहे. २०-२१ साठी ५०१ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून ई कॉमर्स, टेक्सटाइल, फिनटेक क्षेत्राचे तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना लागु करण्यात येईल. नवीन उद्योग क्षेत्रात ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. दरमहिना रक्कम खासगी आस्थापनांद्वारे प्रशिक्षणासाठी दिली जाईल. राज्य शासकीय निमशासकीय अस्थापनांसाठी निधी दिला जाईल. या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे.

शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवून १ लाख थाळी करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवंर्धन आणि जतनासाठी मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा