सरकारचा तीन कोटींचा महसूल बुडवला, औरंगाबाद ग्रामीणच्या तहसीलदारांची विभागीय चौकशी

0
364
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन तहसीलदार यांनी कुळ जमीन विक्री व्यवहारास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन करून खरेदीदारांकडून जमिनीच्या रेडीरेकनर दरानुसार निम्मी रक्कम वसूल केली नसल्यामुळे शासनाचा तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रकरणी  महिनाभरात दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी: दादरा-नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविला आहे. केंद्र सरकारनेही तपास एनआयए कडे सोपविला आहे. याबाबत नि:पक्षपातीपणे चौकशी करुन जे कोणी यामध्ये दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा