राज्य महिला आयोगाचे कार्यालय विभागीय स्तरावर स्थापन करणार, ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

0
36
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: महिला व बालविकास विभागाच्या बळकटीकरणासाठी लवकरच प्रत्येक विभागीय स्तरावर राज्य महिला आयोगाचे कार्यालय स्थापन करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी विधानपरिषदेत सांगितले.    

राज्य महिला आयोगामार्फत ‘प्रज्वला’ योजना महिला सक्षमीकरणासाठी व उत्थानासाठी राबविण्यात आली होती. या योजनेच्या निधीच्या गैरवापराबाबत चौकशी समिती स्थापन करुन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुढील कारवाई केली जाईल, असेही मंत्री ॲड ठाकूर यांनी यावेळी सांगितले. डॅा. मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.त्यावर उत्तर देताना मंत्री ॲड ठाकूर बोलत होत्या.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पिडीत महिलांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे या गोष्टीशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य महिला आयोगामार्फत ‘प्रज्वला’ या नावाने महिला सक्षमीकरणासाठी सर्व महिला बचत गटातील महिलांकरिता जून, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्त्रियांच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे या आयोगाच्या महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता महिला बचत गट प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत, असेही मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा