यंदा शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळणार वेळेत, पणन महासंघ काढणार १हजार ५०० कोटींचे कर्ज

0
25
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे  बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने घ्यावयाच्या १५०० कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी मंजूर करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक झाली. मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणारी हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. २०२०-२१ हंगामाकरिता केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ प्रतिक्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ प्रतिक्विंटल असा हमी भाव निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे.

कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने, खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी झालेले असल्याने व केंद्र सरकारने हमी भावात केलेली वाढ विचारात घेता कापूस पणन महासंघास या हंगामात मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात कापसाची हमी भावाने खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी पणन महासंघास बँक ऑफ महाराष्ट्र यांनी ६.३५ टक्के व्याजदराने १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. हे कर्ज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी आवश्यक असल्याने कर्जास हमी मंजूर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा