राजकीय पक्षांच्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा राज्यातील व्यापाऱ्यांचा निर्णय

0
98
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विविध राजकीय पक्षांकडून पुकारण्यात येणार्‍या बंदमध्ये या पुढे सहभागी न होण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतला आहे. सततच्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. विविध कारणांसाठी राजकीय पक्षांकडून बंदची हाक दिली जाते. हे बंद यशस्वी करण्यासाठी अनेकदा सक्तीने व्यापाऱ्यांची दुकाने बंदही केली जातात. त्यातून राजकीय पक्षांचा स्वार्थ साधला जातो, मात्र व्यापाऱ्यांचे नुकसानच होते, असे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने म्हटले आहे. त्यामुळे या पुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये सहभागी न होण्याचा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतला आहे. या ठरावाला पुणे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही पाठिंबा दिला आहे. राज्यात या पुढे कोणत्याही राजकीय पक्षांच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नाहीत, असे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा