सरकारच्या स्थैर्याबाबत अजितदादांचे पहिल्यांदाच वक्तव्य, म्हणाले ‘त्यांना’ गाजर दाखवावेच लागते!

0
73
संग्रहित छायाचित्र.

साताराः महाविकास आघाडीचे सरकार पडण्याबाबतचे मुहूर्त भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहेत. त्यांच्या या भविष्यवाणीबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असताना याबाबत आतापर्यंत शांत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या स्थैर्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, कार्यकर्ते सोबत रहावेत, म्हणून त्यांना सरकार पडणार असल्याचे गाजर दाखवावेच लागते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रितीसंगमावर आदरांजली अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सरकारला काहीही होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.सरकार पडणारच आहे, असे विरोधीपक्षाला म्हणावेच लागते. कार्यकर्ते बरोबर रहावेत, आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी त्यांना सारखे गाजर दाखवायचे काम करावे लागते. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यंत या सरकारला काहीही होणार नाही, असे पवार म्हणाले.

हेही वाचाः मराठा आरक्षणाशिवाय होणार आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया, शासन आदेश जारी

आम्हाला स्वप्ने पडलीत म्हणून चंद्रकांत पाटलांना कधी कळले? आम्ही स्वप्ने पाहण्याचे काम करत नाही तर थेट कृती करतो, असा टोलाही अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला. जगभरात कोरोनामुळे बिकट परिस्थिती आहे. आम्ही सर्वजण राज्यातील महत्वाच्या गोष्टींवर काम करतो. राज्यातील शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले, असेही अजित पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा