तिढा सोडवण्यासाठी भाजप खेळणार ‘मराठा कार्ड’, ऐनवेळी रावसाहेब दानवेंकडे सोपवणार नेत्तृत्व?

6
10702
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेचे समानवाटप असा कोणताही फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे त्यांचे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील ताणलेले संबंध पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून ऐनवेळी ‘मराठा कार्ड’ पुढे केले जाण्याची शक्यता असून केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे ऐनवेळी सरकारचे नेत्तृत्व सोपवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात निर्माण झालेल्या तणावामुळे भाजप- शिवसेनेतील सत्तावाटपाची बोलणी एक पाऊलही पुढे सरकू शकलेली नाही. दोन्ही पक्षांकडून जी काही विधाने केली जात आहेत, ती प्रसारमाध्यमांमार्फतच केली जात आहेत. त्यातच भाजपचे विदर्भातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते,असा धमकीवजा इशाराच शिवसेनेला दिल्यामुळे या तणावात आणखीच भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली कोंडी फोडून महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी भाजपकडून ऐनवेळी ‘मराठा कार्ड’ पुढे केले जाऊ शकते आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे नेत्तृत्व सोपवले जाऊ शकते, अशी एक शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने शपथविधीचा मुहूर्त निश्चित केला असून 5 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगितले जात असतानाच आमचे असे काहीही ठरलेले नाही, असे खुद्द रावसाहेब दानवे यांनीच स्पष्ट केल्यामुळेही या चर्चेला आणखीच बळ मिळाले आहे.

6 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा