देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

0
57
संग्रहित छायाचित्र .

मुंबईः देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. मुंबईत विधान भवनात झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल आणि आम्ही पुढची पाच वर्षे स्थिर सरकार देऊ, असे फडणवीस  यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजपच्या दहा आमदारांनी अनुमोदन दिल्यानंतर फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. फडणवीस यांची नेतेपदी निवड झाल्यामुळे आता सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची अपेक्षा आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच नव्या सरकारचे उद्दिष्ट असून राज्याला महायुतीचे स्थिर सरकार देऊ, कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नका, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा